दूध दर आंदोलनावरून सतेज पाटील यांचा गोकुळ आणि त्यांच्या नेत्यांवर निशाणा

कोल्हापूरःद फायरःप्रतिनिधीः दूध दरवाढीच्या मागणीसाठी आज भाजप,रयत संघटना, रासप आदी विरोधी पक्षांनी आंदोलन केले. त्यावरून कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा दूध संघ अर्थात गोकुळ आणि त्यांच्या नेत्यांवर निशाणा साधला. जिल्हा काँग्रेस समितीत झालेल्या या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी दूध दरासंदर्भात भाजपचे आजचे आंदोलन हे त्यांच्या अस्तित्वासाठीचा स्टंट असल्याचा घणाघात केला

ते म्हणाले, कोल्हापुरातील स्थानिक नेत्यांनी मुंबईत विक्री करत असलेल्या दुधातून मिळणाऱ्या पैशातून हिंमत असेल तर शेतकऱ्याला पाच रुपये द्यावेत.दूध उत्पादक शेतकऱ्यांना ज्यादा दर देण्याची सुरुवात तुमच्या संघातुन करा, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. भाजपच्या स्थानिक नेत्यांना कायदा-सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य न करण्याचा इशाराही त्यांनी दिला.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलनात पुण्यात सहभाग नोंदविला. त्यावरून आमदार चंद्रकांत पाटील हे पुण्याचे असल्याने पुण्याला आंदोलन करतात.असा टोलाही त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांना यानिमित्ताने लगावला.CommentsLeave a CommentWhatsApp