साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या: आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली मागणी

जयसिंगपूर:द फायर:प्रतिंनिधी:

शाळेची पायरी ज्यांनी चढली नाही, कोणतेही शालेय शिक्षण ज्यांच्या नशिबात नव्हते अशा क्रांतिकारी साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारचा सर्वोच्च असा भारतरत्न हा पुरस्कार दिला पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी  मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे,

वंचित, उपेक्षित, कष्टकरी, श्रमजीवी वर्गाचा आवाज सर्वदूर पोहोचवणाऱ्या आण्णाभाऊंनी मराठी साहित्याला प्रचंड मोठे साहित्य दिले आहे, शाहीर म्हणून परिचीत असणाऱ्या आण्णाभाऊंनी कथा, कादंबऱ्या, वगनाट्य, लावण्या साहित्यामधील या सर्व प्रकारांना भरभरून अस दिलं. संयुक्त महाराष्ट्र अथवा गोवा मुक्तीच्या आंदोलनांमध्ये प्रबोधनाच्या माध्यमातून आण्णाभाऊ साठे यांनी मोठे योगदान दिले आहे,

सामान्य कुटुंबात जन्मलेला हा देव माणूस शालेय शिक्षण झाले नसतानासुद्धा समग्र साहित्य आणि समाजप्रबोधनाचे एवढे मोठे काम करू शकतो याची ऊद्याच्या पिढीसमोर नोंद व्हावी आणि या प्रतिभाशाली आणि प्रतिभावंत समाजसुधारकाला भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त व्हावा असेही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहेCommentsLeave a CommentWhatsApp