महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात राम जन्मभूमी पूजनाचा गुढी उभारून आनंदोत्सव साजरा

कोल्हापूर:द फायर:प्रतिंनिधी: शेकडो वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत रामजन्मभूमी पूजनाचा समारंभ उत्साहात संपन्न झाला.या मंगलप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते महालक्ष्मी अंबाबाई मंदिरातील महाव्दार येथे गुढी उभारुन पुजा करण्यात आली.

तसेच महालक्ष्मी अंबाबाईची हिरेजडित सुवर्ण अलंकारांनी विषेश पुजा बांधण्यात आली असून मंदिरातील गर्भगृह व पितळी ऊंभऱ्यापर्यत रांगोळी आणि फुलांची सजावट करुन आकर्षक विध्यूत रोषणाई करण्यात आली आहे यानिमित्ताने धार्मिक विधी ,मंत्रपठण, भजन आसे कार्यक्रम यावेळी करण्यात आले

या कार्यक्रमप्रसंगी  देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, व्यवस्थापक धनाजी जाधव, पुजारी माधव मुनिश्वर, केदार मुनिश्वर आणि समितीचे कर्मचारी उपस्थित होतेCommentsLeave a CommentWhatsApp