+91 7972884333 | thefire.in@gmail.com |
Breaking News
रुग्णांना दाखल करुन घेण्यास खासगी रुग्णालयांनी नकार दिल्यास साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई करावी: जिल्हाधिकारी दौलत देसाई एनडीआरएफची आणखी दोन पथके गुरुवारी कोल्हापुरात दाखल होणार: आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर चिंताजनकःजिल्ह्यात दिवसभरात तब्बल 702 नवे कोरोना पॉझिटिव्ह ,12 जणांचा मृत्यू पावसाचा जोर कायम,पंचगंगा नदीने गाठली इशारा पातळी, महापुराचे सावट महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात राम जन्मभूमी पूजनाचा गुढी उभारून आनंदोत्सव साजरा अयोध्यात ‘राम मंदिर’ भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संपन्न सोने दराचा नवा विक्रम,दहा ग्रॅम 54,798 रुपये दर माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन खासगी रुग्णालयातही होणार कोरोनावर जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार सुशांत सिंग आत्महत्याःबिहारची सीबीआय चौकशीची मागणी
01 Jul 20 by Administrator 232 पर्यटन

पंढरपूर:द फायर:प्रतिंनिधी:  महाराष्ट्राचे अराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या विठुरायाचरणी आषाढी एकादशीच्या पर्वावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पंढरपूरच्या श्री विठ्ठल - रखुमाई मंदिरात शासकीय महापूजा पार पडली. महापूजेच्या वेळी विणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे आणि त्यांच्या पत्नीला मानाचे वारकरी म्हणून विठुरायाची पूजा करण्याची संधी मिळाली. शासकीय महापूजेच्या वेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते.

यंदा कोरोंनामुळे दर्शनासाठीची रांग नसल्यामुळे  मंदिर समितीमधून मानाचे वारकरी निवडण्यात आले आहेत. विणेकरी म्हणून सेवा करणाऱ्या ६ जणांमध्ये चिठ्ठी काढून निवड करण्यात आली. विठुरायाकडे साकडं घालत 'आता आम्ही मानवांनी हात टेकले आहेत. त्यामुळं देवा आता चमत्कार दाखव आणि कोरोनाला आजच्या या आषाढीच्या पर्वापासूनच दूर कर असं मागणं घातलं आहे. सर्व संकटं दूर नेण्यासाठी साकडं घातलं', असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Tags:

Share Post