+91 7972884333 | thefire.in@gmail.com |
Breaking News
रुग्णांना दाखल करुन घेण्यास खासगी रुग्णालयांनी नकार दिल्यास साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई करावी: जिल्हाधिकारी दौलत देसाई एनडीआरएफची आणखी दोन पथके गुरुवारी कोल्हापुरात दाखल होणार: आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर चिंताजनकःजिल्ह्यात दिवसभरात तब्बल 702 नवे कोरोना पॉझिटिव्ह ,12 जणांचा मृत्यू पावसाचा जोर कायम,पंचगंगा नदीने गाठली इशारा पातळी, महापुराचे सावट महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात राम जन्मभूमी पूजनाचा गुढी उभारून आनंदोत्सव साजरा अयोध्यात ‘राम मंदिर’ भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संपन्न सोने दराचा नवा विक्रम,दहा ग्रॅम 54,798 रुपये दर माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन खासगी रुग्णालयातही होणार कोरोनावर जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार सुशांत सिंग आत्महत्याःबिहारची सीबीआय चौकशीची मागणी
05 Aug 20 by Administrator 306 राजकारणपर्यटन

अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात अयोध्यातील ‘राम मंदिर’ भूमिपूजन सोहळा पार पडला. राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी साडेअकाराच्या सुमारास अयोध्येत दाखल झाले. त्यांनी हनुमान गढीला जाऊन दर्शन घेतएलई. त्यानंतर त्यांनी रामलल्लाला साष्टांग दंडवत घातला. त्यानंतर प्रत्यक्ष राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला सुरुवात झाली.

यावेळी पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित होते. यापूर्वी पंतप्रधानांनी हनुमान गढी मंदिरात पूजा केली. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपणही केले. सुरूवातीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं अयोध्येत स्वागत केले.

भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान एकूण ९ शिलांचे पूजन झाले. मध्यभागी असलेली शिला कूर्म शिला याच शिलेच्या बरोबर वर रामलल्ला विराजमान होणार आहेत. अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराची कोनशिला बसवली गेली आणि राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. जय श्रीराम आणि हर-हर महादेवच्या गर्जनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बसवली मंदिराची कोनशिला. आज दुपारी १२ वाजून ४४ मिनिटांच्या मुहूर्तावर बसवली कोनशिला.

Tags:

Share Post