+91 7972884333 | thefire.in@gmail.com |
Breaking News
रुग्णांना दाखल करुन घेण्यास खासगी रुग्णालयांनी नकार दिल्यास साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई करावी: जिल्हाधिकारी दौलत देसाई एनडीआरएफची आणखी दोन पथके गुरुवारी कोल्हापुरात दाखल होणार: आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर चिंताजनकःजिल्ह्यात दिवसभरात तब्बल 702 नवे कोरोना पॉझिटिव्ह ,12 जणांचा मृत्यू पावसाचा जोर कायम,पंचगंगा नदीने गाठली इशारा पातळी, महापुराचे सावट महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात राम जन्मभूमी पूजनाचा गुढी उभारून आनंदोत्सव साजरा अयोध्यात ‘राम मंदिर’ भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संपन्न सोने दराचा नवा विक्रम,दहा ग्रॅम 54,798 रुपये दर माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन खासगी रुग्णालयातही होणार कोरोनावर जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार सुशांत सिंग आत्महत्याःबिहारची सीबीआय चौकशीची मागणी
09 Apr 19 by Administrator 421 crime

कोल्हापूर – आपटेनगर येथे शुक्रवारी (ता. ५) रात्री केरबा दगडू डोंगरे (वय ५५, रा. जुना वाशीनाका, आपटेनगर) यांचा अज्ञातांनी चाकूने भोसकून खून केला होता. या प्रकरणी करवीर पोलिसांनी दोन युवकांसह एका अल्पवयीन मुलाला आज सांगलीतून ताब्यात घेतले. निलेश आनंदा आठवले (२१, रा. आपटेनगर), रोहित सुरेश दवडे (१८, रा. सानेगुरुजी वसाहत) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. गाडीने कट मारल्याचा जाब विचारल्याच्या क्षुल्लक कारणातून मद्यधुंद संशयितांनी हे कृत्य केल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्री. देशमुख यांनी या संदर्भात दिलेली माहिती अशी, डोंगरे बागल चौक येथील एका कंपनीत कामाला होते. ते शुक्रवारी (ता. ५) रात्री दहाच्या सुमारास घरी जाण्यासाठी कंपनीतून बाहेर पडले. एका सहका-याने त्यांना आपटेनगर येथील जुन्या नाक्यावर सोडले. तेथून ते चालत जात होते. ते चिव्याचा बाजार येथील कच्च्या रस्त्यावर आले. तेथे मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञातांनी अचानक त्यांच्यावर चाकूने वार करून त्यांना खून केला होता. परिविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा गुन्ह्याचा तपास करीत होत्या. करवीर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या सूचनेनुसार करवीर पोलिस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले. घटनास्थळी असलेल्या नागरिकांकडून प्राथमिक माहिती घेतली. त्याचवेळी सीसीटिव्ही फुटेजमध्ये एका मोटरसायकलवरून तीन संशयित भरधाव जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्या मोटरसायकलचा क्रमांकाचा शोध घेतला. यावेळी संशयित हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली.

आठवले, दवडेसह त्याच्या अन्य एका साथीदाराने कृत्य केल्याचे समोर येताच पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी मुंबई, पुणे, सांगली या ठिकाणी पथके रवाना केली होती. या दरम्यान, आज तिघे सांगली येथे त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसानी मिळाली. त्यानुसार करवीर पोलिस ठाण्याच्या पथकाने आठवले व दवडेला अटक केली; तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मोटारसायकलवून जात असताना कट मारल्याचा जाब डोंगरे यांनी विचारला. यातून वादावादी झाली. यावेळी चाकूने त्यांच्या छातीवर वार केल्याची कबुली संशयितांनी दिली. हल्ला केला त्यावेळी तिघेही संशयित मद्यधुंद अवस्थेत असल्याचे व हल्ल्यानंतर ते मुंबई व परिसरातील नातेवाईकांकडे गेल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

Tags:

Share Post