+91 7972884333 | thefire.in@gmail.com |
Breaking News
रुग्णांना दाखल करुन घेण्यास खासगी रुग्णालयांनी नकार दिल्यास साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई करावी: जिल्हाधिकारी दौलत देसाई एनडीआरएफची आणखी दोन पथके गुरुवारी कोल्हापुरात दाखल होणार: आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर चिंताजनकःजिल्ह्यात दिवसभरात तब्बल 702 नवे कोरोना पॉझिटिव्ह ,12 जणांचा मृत्यू पावसाचा जोर कायम,पंचगंगा नदीने गाठली इशारा पातळी, महापुराचे सावट महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात राम जन्मभूमी पूजनाचा गुढी उभारून आनंदोत्सव साजरा अयोध्यात ‘राम मंदिर’ भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संपन्न सोने दराचा नवा विक्रम,दहा ग्रॅम 54,798 रुपये दर माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन खासगी रुग्णालयातही होणार कोरोनावर जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार सुशांत सिंग आत्महत्याःबिहारची सीबीआय चौकशीची मागणी
01 Aug 20 by Administrator 140 महिला

कोल्हापूर:द फायर:प्रतिंनिधी:  भुदरगड तालुक्यातील पाचवडे येथील 85 वर्षाच्या आजीला आणि शिंदेवाडीतील 4 महिन्याच्या बाळासह आईला आज शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला.पाचवडे येथील मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांची 85 वर्षाची आई देखील 19 जुलै रोजी रात्री 10 वाजता ट्रेनिंग सेंटर येथे उपचारासाठी दाखल झाल्या. डॉ. भगवान डवरी, डॉ.मिलिंद कदम, डॉ. अमोल गुरव, डॉ. महेश गोनुगडे यांनी त्यांच्यावर उपचार केले. दोघांचाही स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्याने त्या दोघांना काल डिस्चार्ज देण्यात आला. जाताना या आजींनी सर्व पथकाला आशीर्वाद देऊ केला.

4 महिन्याचे बाळ आणि आईचीही मात

भुदरगड तालुक्यातील शिंदेवाडी येथील 4 महिन्याचे बाळ आणि त्याची आई 21 जुलै रोजी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना ट्रेनिंग सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. बाळाच्या आईला औषधोपचाराबरोबरोच मानसिक पातळीवर सकारात्मकता निर्माण करणे आवश्यक होते. येथील पथकाने उत्तम पध्दतीने ते केले. बाळालाही योग्य औषधोपचार करण्यात आला. या दोघानाही डिस्चार्ज देण्यात आला.

Tags:

Share Post